नवोपक्रम

नवोपक्रम 
                    
           
            शालेय शिक्षण क्रीडा विभाग
                        महाराष्ट्र शासन

                       यांनी आखलेला

         "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम"
                ——————————

या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला यशस्वी करण्याची धूरा ज्या विभिन्न घटकांवर अवलंबून आहे, त्यातील महत्वपूर्ण घटक म्हणजे आम्ही "शिक्षक".  शिक्षकाला नवचैतन्य देणारी बाब म्हणजे सभोवताली झटणारे उपक्रमशिल शिक्षक, आणि या उपक्रमशिल शिक्षकांचे नविन प्रयोग कार्यशैली चा आत्मा म्हणजे " नवोपक्रम "

🔻नवोपक्रम म्हणजे काय ?  🔻

         🔹 एखादा घटक शिकवतांना पारंपरिक पद्धतीने   शिकविता नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकविणे म्हणजे नवोपक्रम.
     जिल्हा शिक्षणाधिकारी यवतमाळ 🔹विध्यार्थी हसत खेळत शिकु शकेल त्याला अध्ययनात मजा येइल बालचंद्र ,अध्यापनाला एक दीशा देउन त्याद्वारे विध्यार्थी घडले पाहीजे  असे अध्यापन .म्हणजे नवोपक्रम
🔹शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण परंपरेपेक्षा जे काही वेगळे करतो त्याला नवोपक्रम असे म्हणावे
🔹कृतिपाहुन पद्धतशिर अनुकरण करुण नविन ज्ञान मिळविणे
🔹विद्यार्थ्या च्या सर्वांगीन विकासा साठी केलेली वेगळी कृती.
🔹नवोपक्रमांत अनेक उपक्रम कृतींचा समावेश असतो, ज्यांचा वापर नेहमीच्याच अध्यापनात करुन विषयानुरुप काही उद्दीष्टांची पूर्ती केल्या जाते.
🔹परिस्थितिनुसार उपक्रम हा नवोपक्रम होउ शकतो.
🔹नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
🔹 विशेष शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली स्वतः ची तयार केलेली अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
🔹समस्येच्या मुळार्पंयत जाऊन निराकरण करणे म्हणजेच नवोपक्रम.
🔹 नवोपक्रम हा मुलांना खुप काही शिकवतो.
           ________________

🔻नवोपक्रमाची गरज🔻

🔹गुणवत्ता वाढीस येणा-या अडचणी दुर करणे
🔹पारंपारिक अध्यापन पद्धति मुळे विद्यार्थी ही बोअर होतात म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने अध्य्यन अनुभव देऊन उद्देश् पूर्ति करणेसाठी
🔹 To make the process of teaching and learning joyful.....we need to undertake "navopkram"
🔹शिक्षणातील अध्यापनाशी संबंधित क्षेत्रातील सद्य:स्थिती बदलून सुधारणा घडविण्यासाठी नवोक्रमाची गरज आहे.
🔹शिक्षक म्हणून काम करत असतांना आपल्याला अनेक शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते.या समस्यांवर मात करत आपण मार्गक्रमण करत असतो.त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.पारंपारीक पद्धती पेक्षा वेगळी वाट शोधून त्या द्वारा आपल्या समस्येवर मात करणे आवश्यक असते त्यासाठी शिक्षकाची उपक्रमशीलता फार महत्वाची आहे.उपक्रम शीलतेमुळे नव नवीन अध्ययन अनुभव देणे शिक्षकाला शक्य होते.
🔹 विद्यार्थ्यांना ज्या विषयात अडचणी येतात त्या विषयावर नवोपक्रम निवडण्याची गरज म्हणजेच गुणवत्ता वाढीसाठी.
🔹To make condition positive n proceedy innovation is important
🔹 विद्यार्थी जे काही ज्ञान ग्रहण करत आहे ते अजुन चांगल्या पद्धतीने आणि रंजकपने कंटालवाने होता शिकावे म्हणून नवोपक्रमचि गरज आहे असे मला वाटते
🔹 विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आपल्याला जाणवलेल्या समस्या सहेतुक दुर करण्यासाठी नवाेपक्रमाची गरज आहे.
🔹 अध्यापनाला योग्य  दिशा मिळते  याचा  फायदा  विद्यार्थ्यांना  होतो मला  इंग्रजी  विषयासाठी झाला.
🔹नवोपक्रम हा एखाद्या घटकावर परिपूर्णता आणण्याकरीता राबविता येईल
🔹एखादे अभियान पूर्ण करतांना नवोपक्रम उपयोगी ठरतो

🔻नवोपक्रम कसा असावा 🔻

🔹 विषय नाविन्य असावे
🔹 विध्यार्थ्याची कमकुवत बाजु लक्षात घेउन नवोपक्रम ठरवावा
🔹 विषय मुलांशी निगडीत असावा
🔹नवोपक्रम हा कालसापेक्ष असावा शफी सर, ढाणकी, यवतमाळ
🔹ही होत असलेल्या अभिनव चर्चेसमान नवोपक्रम असावा

🔻नवोपक्रमासाठी नमूना विषय 🔻


. पेपरलेस प्रशासन
. प्रोजेक्ट लर्निंग
. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
.   दिवस नवा, भाषा नवी
. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द वाक्य निर्मिती
.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
१०. एक तास राष्ट्रासाठी
११.  भाषिक प्रयोगशाला
१२ .  पर्यावरण संरक्षक दल
१३. सौरऊर्जा जागरुकता वापर
१४.  विषय खोली
१५. आम्ही स्वच्छता दूत
१६.  तंबाकूमूक्त शाळा
१७.  प्लास्टिक मुक्त शाळा
१८.  विज्ञान भवन
१९.  मैत्री संख्यांची
२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
२१.  एक दिवस गावासाठी
२२.  विषय कोपरा - प्रभावी माध्यम
२३.  विशेष विद्यार्थी कोपरा
२४.  पुस्तक भिशी
२५.  शालेय वैयक्तिक स्वच्छता संकल्प
२६.  क्रीडा दूत
२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
२८.  हरित शाळा
२९.  प्रदूषण हटवा अभियान
३०.  चालता बोलता
३१. माझा मित्र परिवार
३२. माझे पूर्व ज्ञान
३३. शब्दगंगा
३४.  कौन बनेगा ज्ञानपती
३५. वर्ड पॉट
३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
३७.  संख्यावरील क्रिया - एक छंद
३८.  प्रश्नमंजूषा
३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
४०.  बालआनंद मेळावे
४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती
४२.  पुस्तक जत्रा
४३.  फन एंड लर्न
४४.  शंकापेटी
४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
४६.  रोपवाटिका निर्मिती
४७. एक तास इंटरनेट
४८.  गांडूळ खत निर्मिती
४९.  Student of the day
५०.  एक तास मुक्त अभ्यास
५१. समस्या सूचना पेटी
५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
५३.  लोकसंख्या शिक्षण
५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव
५५.  वाचाल तर वाचाल
५६.  बिखरे मोती
५७.  Book of the day
५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
५९.  बालसभा
६०.  माझ्या गावचा इतिहास
६१.  परिसरातील भूरुपांची ओळख
६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
६३.  प्रयोगातून विज्ञान
६४.  मुक्त वाचनालय
६५.  खरा मित्र उपक्रम
६६.  गृहपाठ गट
६७.  टाकाऊतून टिकाऊकडे
६८.  हस्तलिखित निर्मिती
६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
७०.  वर्तमानपत्रातून वाचन लेखन समृद्धि
७१. व्यक्तिमत्व विकास संवर्धन
७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
७३.  चला शिकूया लघू़द्योग
७४.  दैनंदिनी लेखन
७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय तयारी
७७. शालेय परसबाग
७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
७९.  खेळातून गणित शिकू
८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग संवर्धन
८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
८२. सांकेतिक भाषेचे खेळ
८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
८५.  परिसरातील कलांची ओळख
८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध संवर्धन
८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
८९.  काव्यनिर्मिती, रचना गायन
९०.  पाणी व्यवस्थापन
९१. बलिराजा चेतना अभियान
९२.  जलसाक्षरता
९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी
९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग
९६ . पुस्तक परिचय भेट
९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
९८ . निर्मल शाळा अभियान
९९.  विविध दिन साजरे करणे